Page list

Monday, July 1, 2024

 वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ?


वकिलांना काळा कोट अनिवार्य:-



वकिलांच्या ड्रेस कोडची सुरुवात एडवर्ड तिसरा याने १३२७ साली केली. त्याकाळी रॉयल कोर्टामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक न्यायाधीशासाठी एक पेहराव असावा असे सुचवले. पुढे १३ व्या शतकाच्या समाप्तीपर्यंत त्याने ठरवलेला पेहराव काहीसे बदल करून बंधनकारक करण्यात आला. त्याकाळी सार्जंट आपल्या डोक्यावर केसांचचा विग घालून बसायचे आणि सेंट पेल्सकॅथेड्रलमध्ये प्रॅक्टिस करायचे. तेव्हा वकिलांची स्टुडंट, प्लीडर, बेंचर आणि बॅरिस्टर या चार भागांमध्ये विभागणी करण्यात आली होती. त्या काळात सोनेरी लाल कपडे आणि खाकी रंगाचा गाऊन परिधान केले जात असे.

     भारतात अधिनियम १९६१ च्या अंतर्गत पांढरा बँड सह काळा कोट वा गाऊन परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामागची भावना अशी आहे की, या पेहरावामुळे वकिलांमध्ये एक शिस्त जोपासली जाते आणि त्यांच्या मनात न्यायाने लढण्याचा एक विश्वास निर्माण होतो. तसेच हा पेहराव त्यांना शांत आणि सन्मानजनक स्वरूप प्रदान करतो. या पेहरावामुळे वकिलांना आणी न्यायाधीशांना समाजामध्ये ओळख मिळते.


डॉक्टरांना पांढरा कोट अनिवार्य:-



डॉक्टरांच्या पांढर्‍या ड्रेसकोडमागेही रंगाचच लॉजिक आहे. पांढरा रंग हा स्वच्छता, पवित्रता, विश्वास आणि प्रामाणिकपणाचं प्रतिक आहे. म्हणूनच वैद्यकीय पेशासाठी हा रंग अत्यंत महत्वाचा ठरतो. हा रंग आपल्याला एकप्रकारची सकारात्मक उर्जा प्रदान करतो आणि त्यामुळं तणावापासुन मुक्ती मिळते. याच कारणामुळं डॉक्टर तसेच दवाखान्यातील अन्य कर्मचारीही पांढर्‍या रंगाचा ड्रेसकोड वापरतात. बहूतांश लॅबमधले कर्मचारी आणि वैज्ञानिकही याच रंगाचे कपडे वापरतात.


पोलिसांना खाकी वर्दी अनिवार्य:-


१९०७ च्या अगोदर पार्ट्यांत भारतात शासन ते प्रशासनापर्यंत ब्रिटिश सरकारच राज्य होतं. तेव्हा त्यांची पोलीस पांढऱ्या रंगाची वर्दी परिधान करायची. पण ड्युटी करत असताना ही पांढरी वर्दी लवकर घाण व्हायची, याचा कर्मचाऱ्यांना खूप त्रास व्हायचा. या डागांना लपविण्यासाठी पोलिसांनी आपल्या वर्दीला वेगवेगळ्या रंगात रंगविण्यास सुरवात केली. पण त्यामुळे त्यांची वर्दी वेगवेगळी दिसू लागली. हे बघून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची वर्दी एकसारखी दिसावी आणि ती ड्युटी दरम्यान लवकर घाण न व्हावी यासाठी “खाकी” रंगाची डाय तयार केली. या खाकी रंगावर धुळीचे आणि इतर डाग दिसतात म्हणून हा रंग वर्दीसाठी ठरविण्यात आला तसेच हा रंग इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही आवडला. त्यानंतर या खाकी रंगाला अधिकृतपणे पोलीस वर्दीत समाविष्ट करण्यात आले. पण याला अपवाद म्हणून कोलकाता पोलिसांची वर्दी आजही पांढऱ्या रंगाची आहे.  यामागील कारण म्हणजे, १७२० साली सुरक्षा वाढविण्यासाठी तसेच गुन्ह्यांवर लगाम लावण्यासाठी कोलकाता पोलीस नियुक्त करण्यात आली. तेव्हा तेथीलचा रंग हा पांढरा होता जो आजही बदलण्यात आलेला नाही. त्याला इतिहासाचा एक भाग मानून आजही तिथले पोलीस पांढऱ्या रंगाची वर्दी परिधान करतात

No comments:

Post a Comment

  वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ? वकिलांना काळा कोट अनिवार्य:- वकिलांच्य...