विलोमपद भाषेची गंमत
विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदि सरळ वाचल्यासाराखेच असते.
लहानपणी विलोम पद प्रकार आवडायचा.
शब्द, वाक्प्रचार , वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी शेवटाकडून सुरूवातीकडे वाचत गेलं तरी बदलत नाही.
मराठीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. लहानपणी तर दोन तीनच माहित होते. विलोम पदाची वाक्ये खालील प्रमाणे ...... इयत्ता सहावीच्या पुस्तकात भाषेची गंमत म्हणून हा भाग दिला आहे .
टेप आणा आपटे.
तो कवी ईशाला शाई विकतो.
भाऊ तळ्यात ऊभा.
शिवाजी लढेल जीवाशी.
सर जाताना प्या ना ताजा रस.
हाच तो चहा
चिमा काय कामाची
भाऊ तळ्यात ऊभा
रामाला भाला मारा
काका, वाचवा, काका
काका, वाहवा ! काका
ती होडी जाडी होती
तो कवी डालडा विकतो
तो कवी मोमो विकतो
तो कवी सामोसा विकतो
तो कवी कोको विकत तो कवी ईशाला शाई विकतो
तो कवी रीमाला मारी विकतो
तो कवी वामाला मावा विकतो
तो कवी व्हिटी ला टिव्ही विकतो
तो कवी विकीला किवी विकतो
तो कवी चहाच विकतो
तो कवी का विकतो?
तो कवी लिली विकतो
तो कवी ऊमाला माऊ विकतो
. तो कवी ठमाला माठ विकतो
तो कवी कणिक विकतो
तो कवी बेड व डबे विकतो
तो कवी ठमीला मीठ विकतो
मराठी राम
तो कवी चक्काच विकतो
तो कवी हाच चहा विकतो
तो कवी राशीला शिरा विकतो
.तो कवी टोमॅटो विकतो
No comments:
Post a Comment