☘️☘️ नाम ☘️☘️
वस्तूचे किंवा तिच्या गुणधर्माचे नाव दर्शवणाऱ्या विकारी शब्दाला " नाम " असे म्हणतात.
प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे , असतात त्यांना " नाम " असे म्हणतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकारी शब्द •••
या शब्दांवर लिंग , वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो.
नाम,सर्वनाम,विशेषण,क्रियापद हे विकारी शब्दात येतात.
अविकारी शब्द •••
याशब्दांवर लिंग, वचन , विभक्ती यांचा परिणाम होत नाही.
शब्दयोगी अव्यय , क्रियाविशेषण अव्यय , उभयान्वयी अव्यय , केवलप्रयोगी अव्यय हे अविकारी शब्दात येतात.
🥀नामाचे प्रकार🥀
1 ] 🌷सामान्य नाम 🌷
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते , त्याला सामान्यांना असे म्हणतात.
उदा. मुलगा , फुल , राक्षस, शाळा , नदी , पर्वत , अप्सरा लेखणी इ.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
2 ] 🌷विशेषनाम🌷
ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा , प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेषनाम असे म्हणतात.
विशेषनाम हे ठेवलेले नाम असते.
विशेषनाम हे व्यक्ती वाचक असते.
विशेषनाम हे व्यक्तीचे किंवा वस्तूचे नाव असते , ते केवळ खुणेकरता ठेवलेले नाव असते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
3 ] 🌷भाववाचक नाम [ धर्मवाचक नाम ]🌷
ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यामध्ये असलेल्या गुण , धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हटले जाते.
प्राण्यांमधील किंवा पदार्थांमधील गुणाचा , भावाचा अथवा स्थितीचा असा भाव दर्शवणारा शब्द म्हणजेच भाववाचक नाम होय.
उदा- गोडी, बालपण, धैर्य, प्रामाणिकपणा, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी हुशारी,इत्यादी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment