💐सर्वनाम 💐
नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दास ' सर्वनाम 'असे म्हणतात.
सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारे शब्द.
नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामा ऐवजी मी, तू, तो , हा , कोण , आपण यांसारखे शब्द आपण वापरत असतो.
या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ते ज्या नामाबद्दल येतात त्यांचा अर्थ त्यांना प्राप्त होतो.
वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्व नाम येत नाही.
सर्वनामांचे प्रकार
1 ] पुरुषवाचक सर्वनाम
2 ] दर्शक सर्वनाम
3 ] संबंधी सर्वनाम
4 ] प्रश्नार्थक सर्वनाम
5 ] सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम
6 ] आत्मवाचक सर्वनाम
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
1 ] पुरुषवाचक सर्वनाम-
बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात.
a) बोलणार यांचा वर्ग
b) ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा वर्ग
c) ज्यांच्या विषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा व वस्तूंचा वर्ग.
व्याकरणामध्ये यांना पुरुष असे म्हणतात.
अ) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतः विषयी वापरलेले सर्वनाम.
उदा-
मी , आम्ही , आपण आणि त्यांची विभक्ती प्रत्ययांसहित रूपे.
मी गावाला गेलो.
आम्ही फिरायला गेलो.
ब) द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे
बोलणारी व्यक्ती ज्याच्या विषयी बोलते त्याच्याविषयी वापरलेले सर्वनाम.
उदा-
तू , तुम्ही
तू मला हे आधी सांगायला हवे होते.
तुम्ही खूप छान पुस्तक लिहिले आहे.
क) तृतीय पुरुष वाचक सर्वनाम
बोलणारी व्यक्ती ज्याच्या विषयी बोलते त्याच्याविषयी वापरलेले सर्वनाम.
उदा-
तो , ती , ते , त्या
तो खेळत आहे.
ती परदेशात गेली आहे.
ते अभ्यास करत आहेत.
2 ] दर्शक सर्वनाम
जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनामे ते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात.
उदा-
हा , ही , हे , ह्या , तो , ती , ते , त्या.
हा प्राणी आहे.
हे आंब्याचे झाड आहे.
ह्या कोण आहेत ?
कोयना ही महाराष्ट्रातील महत्त्वाची नदी आहे.
राजगड गडांचा राजा आहे.
परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे.
दर्शक सर्वनामे ही नामापूर्वी व नामानंतर ही येऊ शकतात.
3 ] संबंधी सर्वनामे
वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनाम आशी संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामांना ' संबंधी सर्वनामे' म्हणतात.
उदा-
जो , जी , जे , ज्या
जो तळे राखतो , तो पाणी चाखतो..
4 ] प्रश्नार्थक सर्वनाम
ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो , त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात.
उदा - कोण , काय , कोठे , कोणास
तुला काय हवे ?
दुकानात कोण आहे ?
मी हे साहित्य कुणाला देऊ
5] सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम
कोणत्या नामाबद्दल आले ते सांगता येत नाही व वाक्यात प्रश्नही विचारलेला नसतो.
कोण , काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चित सांगता येत नाही , तेव्हा त्यांना सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात.
उदा-
कोण , काय
मी काय सांगतो ते नीट ऐका.
कोणी कोणास हसू नये.
शहरात काय वाटेल ते मिळेल .
कोणी काही म्हणा , मी हा मार्ग सोडणार नाही.
6 ] आत्मवाचक सर्वनाम
आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ' स्वतः ' असा होतो , तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते.
स्वतः व आपण ही आत्मवाचक सर्वनामे आहेत.
उदा- स्वतः . आपण
मी स्वतः त्याला पाहिले.
तू स्वतः काम करशील का ?
आपण सर्वजण फिरायला जाऊ .
तू स्वतःला काय समजतोस ?
No comments:
Post a Comment