Page list

महाराष्ट्राची प्रतीके

                 

                      राज्य पक्षी -हरियाल

हरियाल पक्ष्याला पिवळ्या पायाचे हिरवे कबुतर असे म्हणता येईल. हरियाल पक्षी हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. ही पक्ष्याची जात उंबर, अंजीर अशा फळांवर ताव मारत असते. सकाळच्या वेळी थव्याथव्यांनी हरियाल फळझाडांवर हल्ला करताना दिसतात. जानेवारीच्या सुमारास हरियालची मादी अंडी घालते. महिन्याभरात त्यातून पिल्ले बाहेर येतात. हरियालला जरी महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हटले असले, तरी

तो संपूर्ण भारतात आढळतो.


         
                  राज्यप्राणी - शेकरू 


शेकरू म्हणजेच मोठी खार. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. झाडांच्या उंच माथ्यावरून उड्या मारत जाणारा हा शेकरू सहजासहजी दिसत नाही. दिवसभर दडून बसलेला शेकरू पहाटेच्या वेळी किंवा संध्याकाळी दिसू शकतो. शिकारी पक्षी आणि बिबळे शेकरूला फस्त करतात. फळे व बिया खाणारा शेकरू झाडांवरच घरटे बांधून राहतो. महाराष्ट्रात भीमाशंकर अभयारण्यात आणि संपूर्ण पश्चिम घाट परिसरात शेकरू आहेत.




                राज्य फुलपाखरू -ब्लू मॉरमॉन

‘ब्ल्यू मॉरमॉन’ या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित  करण्यात आले आहे. देशात महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिलेच राज्य ठरले आहे.   ‘राज्याचे फुलपाखरू’ म्हणून कुठल्याही प्रजातीला नामनिर्देशित करण्यात आलेले नव्हते.म्हणून राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव पहिले राज्य आहे.



             ‌‌  राज्यफुल -जारूल/ ताम्हण


Lagerstroemia speciosa , ज्याला जायंट क्रेप-मर्टल म्हणून ओळखले जाते, त्याला भारताची शान म्हणून देखील ओळखले जाते आणि हे महाराष्ट्राचे राज्य फूल आहे. ही शोभेची वनस्पती भारत आणि फिलीपिन्ससह दक्षिण आशियातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशातील आहे. वनस्पतीच्या पानांचा वापर चहा बनवण्यासाठी केला जातो आणि हे औषधी मूल्यासाठी फिलीपीन सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलेल्या हर्बल वनस्पतींपैकी एक आहे. वनस्पती थेरवडा बौद्ध धर्मातील ज्ञानाचे प्रतिनिधित्व करते. जरुल, ज्याला मराठीत “ताम्हण” असेही म्हणतात, त्याचे नाव एका स्वीडिश निसर्गशास्त्रज्ञाच्या नावावरून ठेवण्यात आले. फुलाचा अर्थ नेत्रदीपक किंवा दिखाऊ असा आहे. जरुल हा लिथ्रम कुटुंबातील एक सदस्य आहे, ज्याला लिथ्रेसी देखील म्हणतात. फ्लॉवर महत्त्वपूर्ण आहे कारण ते औषधे आणि इतर आरोग्यसेवा उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाते.



                       राज्य वृक्ष-आंबा


महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आंबा आहे व भारताचं राष्ट्रीय फळ देखील आंबा आहे. हा वृक्ष महाराष्ट्राच्या सर्वच भागांत वाढताना दिसतो. हा एक सदाहरित वृक्ष असून त्याच्या नानाविध गुणधर्मांमुळे तो लावण्या-वाढविण्यासाठी लोकप्रिय आहे.

आंब्याच्या किमान 500 जाती असून त्या भारताव्यतिरिक्त उष्ण कटिबंधातील पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, मेक्सिको, चीन, इंडोनेशिया, ब्राझील, नायजेरिया, फिलिपिन्स अशा अनेक देशांत वाढविल्या जात असल्या, तरी त्यातील अनेक मूळरूपी भारत, पाकिस्तान व बांगलादेशातील (पूर्वीच्या हिंदुस्तानातील) आहेत. बांगलादेशचा हा राष्ट्रीय वृक्ष आहे. आम्रवृक्ष 120 फुटांपर्यंत उंच वाढतो आणि तो डेरेदार (40-50 फुटांपर्यंत व्यासाचा), भरपूर सावली देणारा असतो. त्याचे आयुष्यही भरपूर असते. 300 वर्षे वयाचे फळे येणारे आम्रवृक्ष पहिले गेलेत. याला थंडी मात्र सोसत नाही. तापमान जर शून्य डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून खाली गेले, तर हा वृक्ष मरतो.


 
                      राज्याचे ब्रीदवाक्य 
 
प्रतिपचंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्व वंदिता महारष्ट्रस्य राज्यस्य मुद्रा भद्राय राजते 


 याचा अर्थ, महाराष्ट्र शासनाच्या शिक्कामोर्तब चंद्राच्या पहिल्या दिवसाप्रमाणे वाढेल. संपूर्ण जग त्याची पूजा करेल आणि केवळ आपल्या लोकांच्या फायद्यासाठी चमकेल.


No comments:

Post a Comment

  वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ? वकिलांना काळा कोट अनिवार्य:- वकिलांच्य...