वीज कशी तयार होते?
आपल्याला माहीतच असेल की, अनेकदा ढगाळ वातावरण निर्माण होत, त्यावेळी जर ढगाळ वातावरणामध्ये वातावरणात बदल झाल्यास ढग एकमेकांवर येऊन आदळतात, जेव्हा ढग एकमेकांवरती येऊन आदळतात तेव्हा इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होतो, आणि अशाच वेळी जेव्हा ढग वारंवार वारंवार एकमेकांवरती आदळू लागतात अशा परिस्थितीमध्ये दोघांच्या घर्षणामुळे वीज निर्माण होत असते आणि त्याचवेळी आकाशातून जमिनीकडे वीज आकर्षित होते, याच दरम्यान इलेक्ट्रिक चार्ज देवाणघेवाण फार मोठ्या प्रमाणावर होत असते, ढगांच्या प्रमाणेच विजेची गती देखील फार मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. असे सांगितले जाते की विजेची गती एक लाख किलोमीटर प्रति सेकंद याप्रमाणे स्थलांतरित होते. म्हणजेच जवळपास प्रकाश वर्ष एवढी गती प्राप्त होते.
ढगांचा आवाज कसा येतो.?
जेव्हा वीज वरून जमिनीच्या दिशेने अतिशय गतीने खाली येत असते, तेव्हा आकाशामध्ये विजेची परिस्थिती तयार होऊ लागते व अशावेळी विजेचा प्रवाह होत असताना आजूबाजूच्या वातावरणातील हवा अतिशय गरम होत असते ही हवा जवळपास 20 हजार ते 50 डिग्री सेल्सिअम पर्यंत गरम होऊन जाते, त्यामुळे हवा इतकी गरम होते की, ती वीस- वीस फुटाप्रमाणे पसरू लागते. वातावरणामध्ये त्यामुळे आजूबाजूला वेगाने लहरी निर्माण होत जातात. त्यातून निर्माण होणारे तरंग तयार होतात आणि हेच तरंग सर्व दिशांनी वेगाने फेकले जातात.
त्यामुळे ढगांचा आवाज येणे यामागचे खरे कारण म्हणजे हे तरंग आहेत, याच ध्वनी लहरींची गती 340 मीटर प्रतिसेकंद असते, यावरून आपण अंदाज लावू शकतो की वीज किती दूर पडली आहे.
No comments:
Post a Comment