1) अकरावा रुद्र अतिशय तापट मनुष्य
2) अकलेचा कांदा मूर्ख
3) शेंदाड शिपाई भित्रा
4) अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे
5) उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा
6) उंबराचे फूल दुर्मिळ वस्तू
7) कळीचा नारद कळ लावणारा
8) खुशाल चेंडू चैनीखोर माणूस
9) गडांतर भीतीदायक संकट
10) जमदग्नीचा अवतार रागीट
11) नऊ कोट नारायण खूप श्रीमंत
12) बोके संन्यासी ढोंगी मनुष्य
13) चर्पटपंजरी निरर्थक बडबड
14) खडाष्टक जोरदार भांडण
15) पांढरा परीस लबाड
16) अकलेचा खंदक अत्यंत मूर्ख मनुष्य
17) ओनामा सुरुवात, प्रारंभ
18) भाकड कथा बाष्कळ गोष्टी
19) मेषपात्र बावळट
20) वाटाण्याच्या अक्षता नकार
21) सव्यसाची उलट सुलट काम करणारा
No comments:
Post a Comment