Page list

जिल्ह्याचे नाव कसे पडले

 💐जिल्ह्याला नाव कसे पडले 💐


🥀नाशिक 🥀


 महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा त्या आसपासच्या परिसरातील विविध नावांनी ओळखला जातो. नाशिकचे जुने नाव गुलशनाबाद म्हणजे फुलांचे नगर होते. तसेच सुरवातीचे नाव त्रिकंटक होते. तसेच गोदावरी तीरावरील नऊ टेकड्यांवर वसलेले असल्यामुळे नऊ शिखरांचे शहर म्हणजे नाशिक म्हणून या जिल्ह्यास हे नाव देण्यात आले. तसेच पौराणिक काळात चौदा वर्षे राम लक्ष्मणाचा वनवास नाशिक जवळील जंगलात गेला. त्यावेळी लक्ष्मणाने शूर्पणखा नावाच्या राक्षसणीचे नाक कापले होते. संस्कृतमध्ये नाकाला नासिक म्हणतात, म्हणूनच या शहराचे नाव नाशिक असे पडले आहे.                              •••••••••••••••••••••••


 🥀उस्मानाबाद🥀


महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याची भूमी ही श्रीराम वनवासात असताना त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मानली जाते. या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. त्यानंतर २० व्या शतकाच्या सुरवातीला तत्कालीन निजाम उस्मान अली याने स्वत:च्या नावावरुन या शहराला उस्मानाबाद असे नाव दिले आहे.


          ••••••••••••••••••••••••••


 🥀परभणी🥀


महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हा पुरातन काळातील प्रभावती देवीच्या मंदिरावरुन या जिल्ह्यास परभणी असे नाव देण्यात आले आहे.


       ••••••••••••••••••••••


 🥀पुणे🥀


महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा विद्येचे माहेरघर या नावाने ओळखले जाते. तसेच राष्ट्रकूट राजवटीत या शहराचे नाव पुनवडी होते. पुण्य या शब्दावरुन पुणे अशी ओळख निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येते.


        ••••••••••••••••••••••


 🥀रायगड🥀


महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचं मराठ्यांच्या इतिहासाशी असलेले नाते अतूट आहे. रायगड जिल्ह्याचे पूर्वी कुलाबा हे नाव होते. श्री छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड किल्ला याच जिल्ह्यात असल्याने कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड असे करण्यात आले आहे.

    •••••••••••••••••••••••••••


 🥀सांगली🥀


महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली. त्यामुळे सांगलीला पूर्वी नाट्यपंढरी या नावानेही संबोधले जात होते. सांगली येथील हळद बाजारपेठ ही आशिया खंडामधील सर्वांत मोठी हळदीची बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सांगलीला हळदीची मोठी बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते.


          •••••••••••••••••••••••••


 🥀सातारा🥀


महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यास तेथील असलेल्या सतरा बुरुजांमुळे सातारा हे नाव रुढ झाले आहे. तेथील किल्ल्याचे मूळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. त्यानंतर पुढे ते सातारा झाल्यामुळे त्याची अशी ओळख प्रचलित झाली आहे.


      •••••••••••••••••••••••


 🥀सिंधुदुर्ग 🥀


महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणच्या दक्षिणेकडील भाग आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पूर्वीचे नाव दक्षिण रत्नागिरी होते. मालवणच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या बेटावरील सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन या जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले आहे.


      ••••••••••••••••••


 🥀सोलापूर🥀


महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयातील शिवयोगी श्री सिध्देश्‍वर लिखित शिलालेखानुसार सोन्नलगी हे नाव पूर्वी सोलापूर शहरास होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे नाव सोळा म्हणजे सोला आणि पूर असे नाव तयार झाले आहे. म्हणजे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, चादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रिकरणाने सोलापूर हे नाव पडले आहे.


      ••••••••••••••••••


 🥀ठाणे🥀


महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक होते. सागरी, डोंगरी आणि नागरी अशी वैशिष्टयपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याला लाभलेली आहे. सर्वाधिक महसूल उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. सर्वाधिक धरणं असल्यामुळे पाणी पिकवणारा जिल्हा अशी ठाणे जिल्ह्याची ओळख आहे.


  ••••••••••••••••••••••


 🥀वर्धा🥀


महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचे नाव हे जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरुन देण्यात आले आहे. त्यामुळे वर्धा शहराची ओळख निर्माण झाली आहे.


.........................................................................................................


 वाशिम 


महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यास प्राचीन इतिहास लाभलेला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषीच्या नावावरुन हे नाव पडले असे म्हटले जाते.


  •••••••••••••••••••••


 🥀यवतमाळ🥀


महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा हा पूर्वी वणी किंवा ऊन या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर जिल्ह्याचे नाव हे यवत म्हणजे टेकडीवरील सपाटीचा प्रदेश अशा शब्द रचनेतून यवतमाळ हे नाव पडले.


    ••••••••••••••••••••••••


 🥀अकोला🥀


महाराष्ट्रातील अकोला या शहरात पूर्वी अकोलसिंग नावाच्या राजपूर सरदाराचा शहराशी संबंध आला. त्यानेच हे गाव वसवले असल्यामुळे अकोलसिंगाच्या नावावरुन अकोला असे नाव ठेवण्यात आले.

No comments:

Post a Comment

  वकिलांना काळा कोट आणि डॉक्टरांना पांढरा कोट का आणि हे कुणी ठरवले तसेच पोलिसांना खाकी ड्रेस कोड का ? वकिलांना काळा कोट अनिवार्य:- वकिलांच्य...