मूलभूत संगणक कोडीग प्रशिक्षण 2025-2026
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,फलटण आणि PI Jam फाउंडेशन_ उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 'मूलभूत संगणक आणि कोडींग' प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण व प्रकल्प सादरीकरण सोहळा आज सातारा येथे पार पडला. त्यामध्ये आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसवे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. *शालेय परिसरात गांडूळ खत निर्मिती प्रकल्प* या प्रकल्पाचे उत्तम प्रकारे सादरीकरण केल्याबद्दल सातारा जिल्हा परिषद ,प्राथमिकचे सन्माननीय शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी साहेब, सन्माननीय शबनम मुजावर मॅडम, डायटचे अधिव्याख्याता सन्माननीय फडतरे साहेब यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या उपक्रमाची आज शेतीला, शालेय परसबागेला अत्यंत गरज आहे सदर उपक्रम शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेत राबवून त्याचा शालेय परसबागेलाही वापर केला रासायनिक खतांचे दुष्परिणाम पाहता अशा प्रकारच्या सेंद्रिय खत निर्मितीची आज गरज असल्यामुळे स्वतः मुजावर मॅडम आणि फडतरे साहेब यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे अभिनंदन केले. तसेच उज्जीवनचे प्रतिनिधी आणि माननीय श्री महेश तोत्रे सर यांनी देखील विद्यार्थ्यांना समस्या कशी जाणवली ते गांडूळ खत कसे , कोठे तयार केले , गांडूळे कुठून आणली,पर्यंत वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारून तसेच त्याची गरज, महत्त्व सर्व गोष्टींपर्यंत चर्चा करून एकंदरीत प्रकल्प निवड छान व शालेय परस बागेतही त्याचा वापर झाला याबद्दल कौतुक केले.








 
 
 
