पुरातत्व
विविध मानवी समाजांनी भूतकाळात निर्माण केलेल्या अनेक वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष ठिकठिकाणी पाहायला मिळतात. त्यांतील सर्वच जमिनीवर असतात असे नाही. वर्षानुवर्षे पुराने वाहून आणलेल्या गाळाचे किंवा वाऱ्याने वाहून आणलेल्या मातीचे थर साचून त्याखाली काही अवशेष गाडले जातात. मानवाने घडवलेल्या वस्तू आणि वस्तू यांच्याप्रमाणेच मानव आणि प्राणी यांच्या सांगाड्यांचे अवशेषही अशाच पद्धतीने गाडले गेलेले असतात. अशा अवशेषांना पुरावशेष म्हणतात. 'पुरा' म्हणजे जुने.
भूतकाळातील वस्तू आणि वास्तू यांच्या तसेच त्यांच्या अवशेषांच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करणाऱ्या शास्त्रात पुरातत्व शास्त्र असे म्हणतात. पुरावशेष शोधून काढण्याचे आणि त्यांचा अभ्यास करण्याचे काम पुरातत्त्वज्ञ करतात. जमिनीखाली गाडले गेलेले पुरावशेष उजेडात आणण्यासाठी जमिनीचा एक एक थर अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने तपासत काळजीपूर्वक रीतीने करण्याला 'पुरातत्वीय उत्खनन' असे म्हणतात. पुरावशेष जिथे सापडू शकतील, अशा स्थळांचा प्रथम शोध घेतला जातो त्यांची व्यवस्थित नोंद केली जाते त्यानंतर कोणत्या स्थळी उत्खनन करायचे याचे नियोजन केले जाते. उत्खननात सापडलेल्या अवशेषांचा अभ्यास करत असताना पुरातत्त्वज्ञ आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात.
No comments:
Post a Comment